ठाणे शहरात एका व्यावसायिकाची खडी पुरवण्याच्या व्यवहारात 1.27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपीचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तक नगर पोलिसांनी बुधवारी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका व्यावसायिकाच्या विरुद्ध गुन्हेगारी विश्वासभंग आणि फसवणूक करण्याप्रकरणी भारतीय दण्ड संहितेच्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीला बांगलादेशात खडी पुरवठा करार करण्याचे आमिष दाखवले आणि परतावा अमेरिकन डॉलर मध्ये देण्याचे आश्वासन दिले.
फिर्यादीने सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 1.27 कोटी रुपयांचा खडी पुरवठा केला. आरोपीने कराराची पूर्तता न करता खडीचे साहित्य दुसऱ्या पक्षाला विकले आणि पैसे देखील परत दिले नाही. आरोपीला या बाबतीत विचारले असता त्याने काहीच उत्तर दिले नाही .
या वर फिर्यादीने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरु केला आहे. अद्याप कोणालाही अटक केली नाही. चौकशीनंतर पोलीस पुढील कारवाई करण्याचे सांगण्यात येत आहे.