Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

११ वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून अत्याचार

११ वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून अत्याचार
, शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (17:06 IST)
मुंबईत साकीनाका बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच अवघ्या १५ दिवसांत मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. मुंबईत रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कांजूरमार्गमध्ये हा प्रकार घडला असून पोलिसांनी वॉचमनला अटक केली आहे. 
 
कांजूरमार्गमधील एका रहिवासी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या वॉचमनने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे. या प्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
 
शुक्रवारी रात्रीच वॉचमॅनला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सोसायटीची सुरक्षा ज्यांच्याकडे असते त्या सुरक्षा राक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Breaking:पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सोबत मं‍त्र्यांचा देखील राजीनामा