Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

मुंबई विमानतळावर अपघातात परदेशी प्रवाशासह 5 जण जखमी

accident
, रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (17:10 IST)
मुंबई विमानतळावर रविवारी भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून, यात ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी मुंबईतील टर्मिनल 2 निर्गमन परिसरात मर्सिडीज-बेंझ पर्यटक वाहनाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, चालकाने प्रवाशांना गेट 1 वर खाली उतरवले, मात्र त्यांना खाली उतरवल्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन गेट 3 समोरील रम्पवर  आदळले.
या अपघातात 5 जण जखमी झाले आहे. त्यात झेक प्रजासत्ताकचे दोन परदेशी प्रवासी आणि विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाचही जणांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहन आणि चालक ताब्यात असल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. घटनेच्या वेळी चालक दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू