पालघर जिल्ह्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीला रविवारी अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.शनिवारी दुपारी त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.
अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिता घरी एकटी असताना भोईरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर तो घटनास्थळावरून पळून गेला.
अधिका-याने सांगितले की, पीडितेने तिच्या आई-वडिलांना घडलेले सर्व सांगितल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ते म्हणाले की, पोलिसांनी भोईर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.