मुंबई पोलिसांना हाजीअली येथे 17 अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला फोन करून एका इसमाने दिली असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची शोध घेतल्यावर त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सदर फोन उल्हासनगर भागातून आल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांना या पूर्वी देखील अफवांचे फोन आले आहे.
20 ऑगस्ट 2022रोजी मुंबई पोलीस तपास यंत्रणात मुंबई पोलिसात 26 /11 सारखा हल्ला करण्याचा धमकीचा फोन आला होता. नंतर हा फोन अफवा आणि खोटा असल्याचे समजले. कसून चौकशी केली असता घटनास्थळी काहीही आढळून आले नाही. चौकशी केली असता कॉलर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे आढळून आले.