Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत 24 मजली इमारतीच्या टेरेस वर जाऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली

suicide
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (22:41 IST)
मुंबईत 24 मजल्याच्या इमारतीच्या टेरेस वर जाऊन गळफास घेऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली आहे.रिया वैभव ठाकूर असे या 15 वर्षीय अल्पवयीन मयत मुलीचे नाव आहे.  
मयत रिया प्रभादेवीच्या कामगार नगर सेंच्युरी म्हाडा इमारतीत आपल्या पालकांसह राहत होती. शनिवारी सकाळी 10:15 च्या सुमारास रिया टेरेस वर गेली आणि रियाने ओढणीचा गळफास लावून आत्महत्या केली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि मृतदेह रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jhulan Retirement: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झुलनला गार्ड ऑफ ऑनर