Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मुलं चोरणारी टोळी सक्रिय , पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मुंबईत मुलं चोरणारी टोळी सक्रिय , पोलिसांचे  नागरिकांना आवाहन
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (19:38 IST)
सध्या सोशल मीडियावर लहान मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली आहे. हा मेसेज सांगली -विरार नंतर कल्याण डोंबिवलीत सोशल मीडियावर पसरला आहे. या मेसेज मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सध्या लहान मुलांचे अपहरण करून नेणारी टोळी सक्रिय झाली असून या टोळीने काही लहान मुलांना पळवून नेल्याचा मेसेज सोशल मीडियावर पसरला असून नागरिकांनी सतर्क राहावे असा मेसेज मोबाईलवर पोहोचला. लोकांनी हा मेसेज स्टेटस म्हणून लावण्यात आला. या प्रकरणी कल्याण झोन 3चे पोलीस सक्रिय झाले असून ही अफवा कोणी पसरवली ह्याचा शोध सुरु आहे. 
 
सध्या सोशल मीडियावर मुलं शिकवणीला जात असणाऱ्या वर्गाच्या बाहेरून मुलं चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली असून क्लासच्या बाहेरून मुलांना पळवून नेले.असा मेसेज व्हायरल झाला. पोलिसांनी या घटनेचा शोध घेतल्यावर अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले आणि मुलं चोरून नेल्याची बातमी कल्याण झोन 3 पोलिसांनी शोधल्यावर कल्याण पश्चिमच्या टिळक चौकातील एका शाळेतील सहावीच्या वर्गातील एका लहान मुलीने तिच्या पालकांना सांगितले की माझ्या वर्गाच्या बाहेर एक महिला आली आणि तिने तोंडावर काळा मास्क लावला होता. आणि तिच्या कडे काळ्या रंगाची कार होती. मुलीने जे काही सांगितले ते ऐकून मुलीचे पालक घाबरले आणि पालकांनी शाळेच्या शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर ही घटना वाऱ्यासारखी पसरली. आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
 
कल्याण झोन 3 च्या पोलिसांनी घडलेल्या या सर्व प्रकारचा शोध घेतल्यावर ती अफवा असल्याचे समजले. अशी कोणतीही घटना घडली नाही असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही मेसेज आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.     
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Surya Nutan :महागड्या गॅसच्या टेन्शनपासून सोलर स्टोव्ह देणार सुटका, किंमत जाणून घ्या