Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

अभिनेते संजय मोने मनसेची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावले

Actor Sanjay Mone
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:24 IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या दोन घटना मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसेच्या भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत आता मराठी अभिनेते संजय मोने  मनसेची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. 
 
संजय मोने यांनी फेसबुक पोस्ट करुन मतदारांना जाणता आणि नेता राजा यामधील फरक ओळखण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनमध्ये हातात सत्ता नसताना ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना लक्षात ठेवा. ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे,त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी”असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते. याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची”सगळे जण दखल घेतात..हो ना? याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा, असे संजय मोने यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक