Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Air Hostess Murder हवाई सुंदरीची निर्घृण हत्या

murder
, सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (12:35 IST)
Air Hostess Murder मुंबईतील पवईमध्ये 23 वर्षीय हवाई सुंदरीची म्हणजेच एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ येथील राहत्या या एअर हॉस्टेसचा मृतदेह सापडला आहे. तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. (रूपल ओगरे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. 
 
रूपल ओगरे ही बहीण आणि तिच्या मित्रासोबत ती एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र दोघेही सध्या गावी गेले होते. रुपल ही  रायपूरची रहवासी आहे. मरोळ येथील एनजी कॉम्पलेक्स येथे ती राहत होती. 
 
रुपलचे घरचे तिला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने घरच्यांना तिच्या मित्राला याबाबत माहिती दिली. त्यावेळी मित्र तिच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा ठोकूनही कुणीही दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला त्यावेळी घटनेची माहिती समोर आली.   घटनेची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी झाले आणि पुढील तपास सुरु केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jasprit Bumrah became a father जसप्रीत बुमराह झाला पिता