Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलाची हत्या करून मृतदेहाचे 5 तुकडे केले

crime news
, गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (13:49 IST)
मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते घरात लपवून ठेवले. दोन दिवसांनंतर त्या व्यक्तीने आपल्या एका नातेवाईकाला घटनेची माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
 
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती देताना मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी सांगितले की, शफीक अहमद अब्दुल मलिक शेख असे आरोपीचे नाव आहे. शफिकने ईश्वर भगवान आव्हाड नावाच्या 17 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेहाचे धारदार शस्त्राने पाच तुकडे केले घरात लपवून ठेवले.
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शफीक अहमदला संशय होता की, ईश्वर त्याच्या पत्नीच्या खूप जवळ आला होता. दोघांचे अफेअर असल्याचा संशयही शफिकला होता. यामुळे संतापलेल्या शफिकने असे पाऊल उचलले. मात्र मृत ईश्वरचे पालनपोषण आरोपी शफीक अहमदच्या पत्नीच्या वडिलांनी केले. याच कारणामुळे शफीकची पत्नी त्याला आपला भाऊ मानत होती. आरोपी शफिकचा दावा आहे की ईश्वर त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन करायचा.
 
शफीकने सांगितले की, वारंवार स्पष्टीकरण देऊनही त्याने आपल्या कृतीत सुधारणा केली नाही, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. ही घटना गेल्या सोमवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बर्थडे गर्ल खिडकीत नाचताना पडली