Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…
, शनिवार, 24 एप्रिल 2021 (22:06 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार झालेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. 
 
सीबीआयच्या या कारवाईनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या अनिल देशमुख यांनी फार काही बोलण्याचे टाळत, मोजक्या शब्दांमध्येच प्रतिक्रिया दिली. “सीबीआयची टीम घरी तपासणीसाठी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने करोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोविड सेंटरला भेट देण्यासीठी काटोलला चाललो आहे.” असं अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले व त्यानंतर ते नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रवाना देखील झाले.
 
“सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.” असं ट्विट देखील अनिल देशमुख यांनी केलं आहे.
 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाकड, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, पिंपळेनिलखमधील 91 सोसायट्या सील, 550 कंटेन्मेंट झोन