Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भातसा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु

मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भातसा  दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु
, गुरूवार, 3 मार्च 2022 (08:30 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी एक असलेल्या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दररोज १५% कपात करण्यात आली आहे. भातसा येथील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी व मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भातसा येथील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. मात्र तोपर्यंत वैतरणा धरणातून २०० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, उच्च वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, तुळशी, विहार व भातसा या सात तलावातून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये एकट्या भातसा धरणातून मुंबईला २ हजार २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता भातसा तलाव येथील जल विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी घुसले. त्यामुळे मुंबईच्या दैनंदिन पाणीपुरवठयावर मोठा परिणाम झाला आहे. पालिका जल अभियंता खात्याने मुंबईला दररोज करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्यात १५% कपात सुरू केली आहे.
 
त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला आहे. आता जोपर्यन्त भातसा तलाव येथील बिघाड दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत मुंबईत दररोज १५% पाणी कपात सुरूच राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास