Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत लोकल प्रवासासाठी प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

मुंबईत लोकल प्रवासासाठी प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
, बुधवार, 2 मार्च 2022 (16:38 IST)
सध्या कोरोनाचा वेग मंदावला असून आता त्यासाठी लावलेले निर्बंध देखील काढण्यात आले आहे. राज्यात शाळा, महाविद्यालये,कार्यालय देखील पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहे. लोकांनी लसीकरण घ्यावे आणि मास्क लावणे बंधनकारक असल्याचे संगितले आहे. मुंबईत लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकार ने मुंबई उपनगरीत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण घेणे आवश्यक आहे. अद्याप  काही लोकांनी लसीकरण केलेले नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लक्ष घेणारे लोकच प्रवास करण्यासाठी सक्षम असतील हे सांगण्यात आले होते. आणि ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नाही त्यांना कुठे ही प्रवेश करण्यासाठी बंदी आहे. राज्य सरकार ने मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधन कारक आहे.तसेच प्रवाशांना प्रतिबंधक लसीकरणं पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

हा राज्य सरकार ने काढलेल्या नियमाला कायम ठेवला असून आता लोकल ने प्रवास करणाऱ्यांना आपल्या जवळ लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगावे लागणार. या नियमांची माहिती राज्य सरकार ने हायकोर्टात सादर केलेल्या निर्णयात दिली आहे.  खंडपीठाने म्हटले आहे की राज्य सरकारचा निर्णयावर नव्या याचिकेद्वारे आव्हान देण्याची मुभा दिली जात आहे. राज्य सरकार नवा निर्णय जाहीर करू शकते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Operation Ganga: 31 विमानांतून 6300 हून अधिक भारतीयांना आणण्याची तयारी