सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती. तर यानंतर न्यायालयानं त्यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव नबाव मलिक जेजे रुग्णालयात दाखल झाले होते.
जेजे रुग्णालयात घेतलेल्या उपचारानंतर काल त्यांना पुन्हा ईडी कोठडीत नेण्यात आलं. आज नबाव मलिक यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगच्या खटल्याला आव्हान दिलंय.
नवाब मलिक यांचे वकिल तारक सय्यद आणि कुशल मोर यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे अवसे समोर येते आहे . तर नबाव मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. यालाही या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे . विशेष न्यायाधीशांनी आपल्याला कोठडीत ठेवण्याचा आदेश हा आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची तसेच आपली तत्काळ सुटका करण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आलीय.