Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला
, शनिवार, 21 डिसेंबर 2024 (15:31 IST)
Mumbai boat accident News: तीन दिवसांपूर्वी नौदलाच्या नौकेने मुंबईच्या किनारपट्टीवर बोटीला धडक दिल्याने बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली शोध मोहीम शनिवारी संपली. मुंबईजवळच्या समुद्रात बोट आणि नौदलाच्या क्राफ्टमध्ये झालेल्या अपघातात बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर 18 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेतील मृतांची संख्या 15 झाली असून त्यात 7 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. नेव्हल हार्बर परिसरात घडलेल्या या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की शोध आणि बचाव मोहिमेचा भाग म्हणून, बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली होती. शोधासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटीशिवाय तटरक्षक दलही तैनात करण्यात आले आहे. या दोन्ही बोटींवर मिळून 113 जण होते, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर नौदलाच्या बोटीत एकूण सहा जण होते त्यापैकी दोघे वाचले आहे. बुधवारी नौदलाच्या बोटीने इंजिनचाचणी दरम्यान नीलकमल या प्रवासी बोटला जोरदार धडक दिली या अपघातात एक नौदल कर्मचारी आणि दोन कंत्राटी कर्मचाऱ्यासह 13 जणांचा मृत्यू झाला तर 100 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 

'नील कमल' ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटावर 100 हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) जारी केलेल्या कागदपत्रांनुसार, बोटीला 84 प्रवासीआणि सहा क्रू सदस्यांना वाहून नेण्याची परवानगी होती.परंतु या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात बोट चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत