Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलची सेवा बंद

webdunia
, गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (14:36 IST)
ओव्हरहेड वायरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं मध्य रेल्वेकडून ट्विटरवर स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी रेल्वेचे कर्मचारी काम करत असून लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी तर लोकलमधून खाली उतरून पायीच मार्गक्रमण सुरू केलं.
 
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलची सेवा बंद पडली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परेल, दादरपासून सीएसएमटीपर्यंत लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. परिणामी प्रवाशांना रुळावरून पायी जाऊन जवळचे स्थानक गाठावे लागत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेनची मागणी केली आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळाला