मुंबईतील चेंबूर परिसरात रविवारी सकाळी एका दुमजली चाळीला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबियातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
सदर घटना चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीत घडली. या दुमजली चाळीला पहाटे 5:20 वाजेच्या सुमारास आग लागली.या आगीत पहिल्या मजल्यावर गाढ झोपेत असलेले कुटुंबातील लोकांना बाहेर निघण्याचा वेळच मिळाला नाही. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केल्यावर सकाळी 9:15 वाजे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवला.
या अपघाताचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
आगीचे नेमके कारण शोधले जात आहे.इमारतीच्या खालच्या मजल्यावर एक दुकान होते त्यात दोन जण झोपलेले होते. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तळमजल्यावर असलेल्या दुकानात आग लागली त्यात दुकानात झोपलेले दोघांचा होरपळून मृत्यू झाला.आग वरच्या मजल्यावर पोहोचली आणि एकाच कुटुंबियातील सात जणांचा होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.