Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अठरा वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाला परवानगी

अठरा वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाला परवानगी
, शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (16:20 IST)
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि लसीकरणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यात येतो. त्यानंतर आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे
 
18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी टिकीट मिळणार आहे. अशा लोकांनी टिकीट काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्रक सादर करणं आवश्यक आहे.
भविष्यात जर लहान मुलांसाठीची लस उपलब्ध झाली तर या वयोगटातील लोकांसाठी रेल्वे प्रवासासाठीची मुभा केवळ पुढचे 60 दिवसांसाठी असेल असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे लोकल प्रवासासाठी केवळ रेल्वेच्या तिकीट घरांमधूनच ही टिकीटं मिळणार आहेत. जेटीबीस, एटीएमव्ही आणि यूटीएसच्या मार्फत ही तिकीटं मिळणार नाहीत.
या आधी 18 वर्षाखालील मुलांना लस उपलब्ध नसल्याने त्यांना रेल्वे प्रवासाची मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्यांची अडचण दूर झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित पवारांच्या हस्ते 74 मीटर उंच भगवा ध्वजाचे प्रतिष्ठापना