मुंबईच्या आर्थिकगुन्हे शाखेकडून भाजपच्या आणखी एका नेत्याला क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल सी समरी रिपोर्ट दिला आहे. मोहित कंबोज यांना कथित बॅंक घोटाळा प्रकरणात पुर्णपणे क्लीन चीट देण्यात आली आहे.
ओव्हरसीज बॅंकेच्या व्यवस्थापकाने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी बॅंकेतून ज्या कंपनीसाठी 52 कोटी कर्ज घेतले ते त्यासाठी न वापरता दुसरीकडे वापरल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंबोज यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. बँक ऑफ बडोदाने मुंबई भाजप युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष मोहित कंभोज यांना कर्जबुडवा घोषित म्हणून जाहीर केले होते. संबंधित कंपनीचा संचालक नसल्याचे कंबोज यांनी म्हटले होते. कर्जाला जामिन देल्याने गेल्या दोन वर्षात जबाबदारी म्हणून ७६ कोटी भरल्याचा त्याने दावा केला होता.
Edited by: Ratnadeep Ranshoor