Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी दिला लॉक डाऊन चा इशारा

मुख्यमंत्र्यांनी दिला लॉक डाऊन चा इशारा
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:21 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे,परंतु अद्याप कोरोना संपलेला नाही.तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही आहेच.नागरिकांची गर्दी वाढत राहिली तर  राज्यात तिसरी लाट येईलच आणि तिसरी लाट आली आणि राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा झाला तर पुन्हा लॉक डाऊन लावण्यात येईल.असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
 
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महानगर पालिका सज्ज आहे.मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले आहे.त्या कोविड सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी ते बोलताना म्हणाले,की ऑक्सिजन च्या साठ्यात वाढ झालेली नाही.ज्या वेळी तिसरी लाट येईल आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवेल अशा स्थितीत ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात लॉक डाऊन लागू शकतो. 
 
सध्या इतर देशात कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये वाढत आहे.आपण आपल्याकडे हा संसर्ग पसरू नये या साठीची काळजी घेत आहोत.जर मुलांना कोरोनाची लागण लागली तर मुलांसाठी हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.या कोविड सेंटर मध्ये लहान मुलांना अववडेल असे वातावरण तयार केले आहे .या सेंटरला बालवाडीचं स्वरूप दिले आहे.या सेंटर मध्ये मुलांसाठी खेळणी आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध केली आहे.
 
लोक अद्याप ही गर्दी करत आहे.आपले अर्थचक्र सुरळीत सुरु राहावे या साठी कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहे. लोक गर्दी करतात हे चुकीचे आहे.असच राहिले तर कोरोनाची तिसरी लाट लवकरच येईल.आपला आणि इतरांचा जीव धोक्यात येईल असं काहीही करू नका.अन्यथा कोरोनाची तिसरी लाट आल्यावर लॉक डाऊन लावावा लागू शकतो.काळजी घ्या कोरोनाच्या नियमांचं कॅंटेकोर पालन करा.सामाजिक अंतर राखा,मास्क लावा,सेनेटाईझर चा वापर आवर्जून करा.असे आवाहन मुख्यमंत्र्यानी जनतेला केलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुथय्या मुरलीधरन यांनी सांगितले की, सध्याच्या काळात कोणते खेळाडू त्यांना चांगले खेळू शकतात