Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासा : मुंबईला कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला, लसीकरण पुन्हा सुरू होणार

दिलासा :  मुंबईला कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला, लसीकरण पुन्हा सुरू होणार
, गुरूवार, 29 एप्रिल 2021 (08:09 IST)
केंद्र सरकारकडून मुंबईकरांसाठी लसीचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मंगळवारी बहुतेक कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. तसेच बुधवारी ही राज्यातील ४० लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांसाठी लसीच्या साठ्याचा पुरवठा प्राप्त झाला असल्यामुळे बुधवारी १२ दुपारी १२ नंतर सर्व शासकीय व महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र सुरु होतील. लसीकरणासाठी शासकीय व महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्र, रुग्णालयांमध्ये कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
 
मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद आहे. परंतु कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप झाला होता. २५ एप्रिलपर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लससाठा २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रांवर शिल्लक होता. लसी संपल्यामुळे पालिकेने लसीकरण केंद्र बंद केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील 539 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती