Publish Date: Sat, 02 Jan 2021 (08:15 IST)
Updated Date: Sat, 02 Jan 2021 (08:18 IST)
मुंबईमध्ये घरात शिरलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले आहे.थर्टी फस्टचे जोरदार सेलिब्रेशन सुरु असताना धारावीत अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. या अजगराला मुंबई पोलीस दलात काम करणारे मुरलीधर जाधव या शिपाईने अगदी सहजरित्या बाहेर काढले.
धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे एका व्यक्तीच्या घराच्या पहिल्या माळ्यावर सहा फूट लांबीचा अजगर पकडण्यात आला. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे. यावेळी घरात घुसलेल्या अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.