Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग; अग्निशमनच्या १४ गाड्या घटनास्थळी

बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग; अग्निशमनच्या १४ गाड्या घटनास्थळी
, शनिवार, 11 जुलै 2020 (09:27 IST)
बोरिवली पश्चिम येथील एका शॉपिंग सेंटरला आज (शनिवार) पहाटे ३ च्या सुमारास ही लागल्याचे आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
 
शॉपिंग सेटंर असल्याने या आगीत बराच मोठा माल भस्मसात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही आग लेव्हल ४ ची असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच, मोठ्या प्रमाणावर काळा धूर या परिसरात पसरला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काय आणि किती नुकसान झाले याचा तपशिल अद्याप मिळू शकलेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे नव्हे तर शेतकर्‍यांनी कर्जबाजरीपणामुळे केल्या आत्महत्या