Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेंडवळ येथे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित

भेंडवळ येथे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित
, शनिवार, 25 एप्रिल 2020 (16:10 IST)
अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी पुढे ढकलून लॉकडाऊन संपल्यावर म्हणजेच 3 मेनंतर वैशाख महिन्यातील कुठल्याही शुभ तिथीला घटमांडणी साकारण्याचे संकेत वाघ महाराजांनी दिले आहेत. त्यामुळे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित झाली आहे. यामुळे गेल्या 300 वर्षांपासून असलेली परंपरा यंदा खंडित होणार आहे. 
 
येथील वाघ घराण्यात ही परंपरा असून, गेल्या 300 वर्षांपूर्वी निलावती विद्येचे ज्ञान असलेले चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरु केली होती. आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरु आहे जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील शेतकर्‍यांचा या मांडणीच्या भाकितावर प्रचंड विश्वास आहे. शेतकरी या मांडणीवर दरवर्षी पीक-पाण्याचे नियोजन करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले