Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

ठाण्यात ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आग, कोणतीही जीवित हानी नाही

fire
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (14:01 IST)
Thane News: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात रविवारी रात्री 23 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली  रविवारी रात्री 10 :30 वाजेच्या  सुमारास वंजारपट्टी नाका  येथील वेदांत हॉस्पिटल जवळ आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आगीचे फोटो व्हायरल झाले असून आगीमुळे वाहनांची वाहतूक कोंडी झाली. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने अग्निशमन कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त  अग्निशमन दलाचे  पाच बंब पाठवले. 
अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुलिंग करण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. 
आगीचे कारण अद्याप कळू शकले माही. आगीची चौकशी सुरु आहे अशी माहिती बीएनएमसी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सुदैवाने या मध्ये कोणतीही जनहानी झालेली नाही. आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: नीलम गोऱ्हेचे वक्तव्य विकृती म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल