ठाणे जिल्ह्यातील भिवंडी दाभाडे गावात श्रद्धा आश्रमशाळेत 17 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विषबाधे मुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांना भिवंडीतील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. विषबाधा झाल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलांना ही विषबाधा अन्नातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडीच्या दाभाडे गावात श्रद्धा ही आदिवासीआश्रम शाळा असून डहाणू, पालघर, जव्हार या भागेतली आदिवासी मुलं-मुली शिक्षण घेतात. सध्या या आश्रमात 421 आदिवासी विद्यार्थी आहे. या शाळेत जेवण केल्यावर काही विद्यार्थ्यांना उलट्या जुलाब होऊ लागले. या मध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून ज्योत्स्ना जयवंत सांबर(9) डहाणू असे तिचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळतातच ठाणेच्या सामान्य रुग्णालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आणि विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रथमोपचार देऊन रुग्णालायात दाखल करण्यात आले. विषबाधा नेमकी कशा मुळे झाली या साठी अन्नाचे आणि पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविले आहे. अहवालातून पाण्यातून विषबाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप अन्नाच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे.