आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 11 वा सामना चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. रविवारी (3 एप्रिल) चेन्नई आणि पंजाबचे संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमनेसामने येतील.
चेन्नईचा संघ पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाला आहे. त्याचबरोबर पंजाबने एक सामना जिंकला असून एकात पराभव पत्करला आहे. आता तिसर्या सामन्यात दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतात हे पाहायचे आहे.
पंजाबविरुद्ध चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळू शकतात. अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राजवर्धन हंगरगेकर आणि इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन यांना पहिल्यांदाच चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळू शकते. टॉन्सिलच्या संसर्गामुळे जॉर्डनला सहा दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ते परतण्याच्या तयारीत आहेत. रवींद्र जडेजा त्यांना संधी देतो की नाही हे पाहायचे आहे.
पंजाबचा संघ तिसऱ्या सामन्यात दोन बदल करू शकतो. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि भारतीय अष्टपैलू ऋषी धवन यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य प्लेइंग-11
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस.
पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग-11
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (डब्ल्यूके), लियाम लिव्हिंगस्टन, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चाहर.