Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत आगामी 3 दिवस जोरदार पाऊस; प्रशासनाकडून ‘त्या’ इमारती रिकाम्या करण्याचा आदेश

मुंबईत आगामी 3 दिवस जोरदार पाऊस; प्रशासनाकडून ‘त्या’ इमारती रिकाम्या करण्याचा आदेश
मुंबई , बुधवार, 9 जून 2021 (08:19 IST)
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील दक्षिण, उत्तर, पश्चिमच्या काही भागात पावसाने हजरी लावली आहे. आता मात्र मुंबईत पावसानं आज सकाळपासून जोर धरला आहे. तर आगामी आणखी 3 दिवस मुंबईमध्ये जोरदार मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या तीन दिवसाच्या यांच्या जोरदार पावसामुळे काहीही हानी होऊ शकते. म्हणून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा आपत्ती विभागाने दिला आहे.
 
मुंबईसह महाराष्ट्रात आज विविध जिल्ह्यात ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, भारतीय हवामान विभागाने आगामी तीन दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
म्हणून दक्षतेचा मार्ग म्हणून मुंबईतील जीर्ण झालेल्या, मोडखळीस आलेल्या इमारती मोकळ्या करण्याचा आदेश देखील हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मुंबईकरांची स्थिती चिंताजनक होताना दिसते.
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुण्यापासून अलीबाग आणि रायगडपर्यंत धडक मारली आहे.
तसेच, आता 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सूनच आगमन दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक जयंता सरकार यांनी दिलीय.
या दरम्यान, मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 11, 12, 13, 14 आणि 15 जून रोजी शहरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याचप्रमाणे मुंबईत आजही अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविडमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी