Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार : डॉ. राजेंद्र शिंगणे

रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार : डॉ. राजेंद्र शिंगणे
, शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:55 IST)
राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
 
६ लाख २० हजारच्या वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार आहे. पुरवठा सुरळीत होण्याकरता आणखी 2-3 दिवस लागणार असल्याची माहिती राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे. आता या कंपन्यांच्या सीईओ आणि एमडी यांच्याबरोबर बैठक झाली आहे. ३७ ते ३८ हजार दिवसाला पुरवठा होतो, तो वाढवला जाणार आहे. १९ एप्रिल -२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे. 
 
रेमडेसेवीरच्या निर्यांत बंदी घातली आहे. निर्यात बंदी घातलेल्या कंपन्यांना महाराष्ट्रात त्यांचा माल विकण्याची परवानगी दिली आहे. ८ ते १० कंपन्यांचा निर्यातीवर बंदी आहे, त्यांचा रेमडेसेवीरचा साठा पडून आहे, तो महाराष्ट्रात जास्तीत जास्त मिळावा यासाठी त्या कंपन्यांबरोबर आमचे अधिकारी संपर्क करत आहेत. 
 
 रेमडेसेवीरची उपलब्ध कमी आहे, काही कंपन्यांनी महाराष्ट्रात एकही इंजेक्शन्स पुरवलेले नाही. सरकारी रुग्णालयात रेमडेसेवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन, असं देखील राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार यांचा 'हा' फोटो चांगलाच झाला व्हायरल