Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत परराज्यातील हजारो मजुरांचा वांद्रे स्टेशनबाहेर जमाव

मुंबईत परराज्यातील हजारो मजुरांचा वांद्रे स्टेशनबाहेर जमाव
, मंगळवार, 14 एप्रिल 2020 (18:57 IST)
देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुबंईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसून आले. येथे वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारो मजूर मोठ्या संख्येत जमले आहेत. हे मजूर आम्हाला आपल्या गावी जाऊ द्या आणि त्यासाठी गाडी सोडण्याची मागणी करत आहेत. 
 
लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार गावी जाण्यासाठी हटून बसले आहेत. हे मजूर जवळपासच्या फॅक्टरीजमध्ये काम करणारे असून गाडी सोडण्याची मागणी करत आहे. यातून अनेक यूपी आणि बिहार येथील लोक आहेत. 
 
पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 
 
या सगळ्या जमावामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार जमले असून लांब पल्ल्याची गाडी सोडा अशी मागणी करत आहे. 
 
आज 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा शेवटला दिवस अल्यामुळे आता वाहतूक सुरु होऊन घरी जायला मिळणार या आशाने परराज्यातील मजुरांना वाटत होते. इकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहे तसेच अडकून पडलेल्या मुजरांची काळजी घेतली जात आहे. तसेच त्यांनी सगळ्या कामगार आणि मजूर वर्गाला विनंती केली की कायदा आणि सुव्यवस्था यांची बंधनं पाळा. सध्या जिथे आहात तिथेच थांबा. सगळ्यांच्या अन्न-पाण्याची, राहण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र संयम सोडू नका. घरची ओढ लागली असल्याचे आम्ही समजू शकतो तरी तूर्तास मुंबई सोडू नका असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील वंचितांच्या साह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप