भुसावळ: रेल्वेत खासगीकरणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. शासनाच्या या धोरणाविरुद्ध नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे बुधवारी डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढून सरकारच्या कामगार विरोधी निर्णयाबद्दल घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी. नायर यांच्या वतीने देशभरात चेतावणी सप्ताहाचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार भुसावळ विभागातील सर्व डेपो मध्ये सभा घेऊन कर्मचाऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली व नंतर बुधवारी सायंकाळी रेल्वे कामगार भवन पासून डीआरएम कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर डीआरएम कार्यालयासमोर सभा घेण्यात आली.
यांचा मोर्चात सहभाग विभागीय सचिव आर. आर. निकम, मंडल अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, मुख्यालय कार्यकारी अध्यक्ष ए. बी. धांडे, जी. जी. ढोले, टी. आर. पांडव यांनी सभेला संबोधित केले. मोर्चाच्या यशस्वितेसाठी अलका चौधरी, महिला अध्यक्ष सुनंदा डांगे, योगेश बारी, वसंत शर्मा, पी. पी. बेंडाळे, बापू पाटील, भवानी शंकर, ललित भारंबे, युवराज इंगळे, दीपक सूर्यवंशी, डी. यु. कोळी, अनिल मिसाळ, ख्वाजा अरीफुदीन, गुरुदत्त मकासरे, ए. टी. खंबायत, श्याम तळेकर, आर. पी. भालेराव यांनी परीश्रम घेतले.