Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
, शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (13:13 IST)
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित होम लोनला परत घेतले आहे. त्याने आपल्या रेपो रेट लिंक्ड होम लोनवर रोख लावली आहे. एसबीआय 1 ऑक्टोबरपासून नवीन प्रॉडक्ट आणणार आहे, जी रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या   दिशानिर्देशाप्रमाणे राहील.  
 
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार्‍या या अधिकार्‍याने सांगितले की एसबीआयने रेपो रेट लिंक्ड आधारित होम लोन रोखला आहे आणि याच्या बदले तो 1 ऑक्टोबरपासून नवीन प्रॉडक्ट आणणार आहे.   
 
महत्त्वाचे म्हणजे एसबीआय पहिले बँक आहे ज्याने आपल्या होम लोनला रेपो रेट लिंक्ड बनवले होते. आरबीआय ने देखील 4 सप्टेंबरपासून सर्व बँकांना रिटेल, पर्सनल आणि एमएसएमई लोनला रेपो रेटशी जोडण्यास सुरू केले होते. यात एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक इत्यादी सामील आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्मला सीतारामण : अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारचा नवा डोस, भारतीय कंपन्यांना करात सवलत