Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर मुंबईत पूर्ण इमारती सील करणार

तर मुंबईत पूर्ण इमारती सील करणार
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:25 IST)
मुंबईत एका इमारतीमध्ये जर ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर पूर्ण इमारती सील करण्याचे आदेश आज महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
 
वाढती रुग्‍णसंख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ३०० मार्शल्‍स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणारऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध सक्‍त सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.
 
'या' आहेत सूचना?
१) लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुमसच्या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तींना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तींची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तींचे विलगीकरण करावे. असिम्‍प्‍टोमॅटिक रुग्‍णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे.
२) ज्‍या रहिवासी इमारतींमध्‍ये पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्‍यात येतील.
३) लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने आणि उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात यावेत.
४) लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्‍या किमान ५ जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करावेत.
५) मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱ्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत असलेल्‍या २,४०० मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करावी. विना मास्‍क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने सध्‍या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्‍या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी.
६) मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करावी.
७) विनामास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करू शकतील.
८) बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी‍ ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करून त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.
९) सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्‍यक्तींनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.
१०) खेळाच्‍या मैदानांवर आणि उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळणाऱ्यांवर कारवाई करण्‍यात येईल.
११) कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या अधिक असलेल्‍या विभागांमध्‍ये मिशन झिरोच्‍या धर्तीवर कार्यवाही सुरू करावी. ज्‍या विभागांमध्‍ये नवीन रुग्‍ण मोठ्या संख्‍येने आढळून येत आहेत, तेथे एरिया मॅपिंग करुन, त्‍या क्षेत्रांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त संख्‍येने चाचण्‍या करण्‍यात याव्‍यात. तसेच अशा परिसरांमध्‍ये प्रति रुग्‍णामागे किमान १५ नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती (हायरिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट) शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवावे.
१२) झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करून संशयितांची तपासणी करावी. फिरत्‍या दवाखान्‍यांच्‍या (मोबाईल व्‍हॅन) माध्‍यमातून रुग्‍ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्‍या कराव्‍यात.
१३) प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये हाय रिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र १ आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र २ असे दोन्‍ही संवर्गातील प्रत्‍येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.
१४) भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्‍बो सेंटर्स) मधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्‍णशय्या, ऑक्सिजन रुग्‍णशय्या यांची पुरेशी उपलब्‍धता ठेवावी, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.
१५) बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्‍णालयांतून कोविड रुग्‍ण, रुग्‍णशय्या आणि इतर आवश्‍यक माहिती दर तासाने संकलित

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना वाढल्यामुळे औरंगाबादमध्ये शाळांना पुन्हा सुट्टी