Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
, सोमवार, 8 मार्च 2021 (07:32 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झालाय. एटीएसनं हा गुन्हा दाखल केला. मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली होती. त्यानंतर एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसनं सगळी कागदपत्रं मुंब्रा पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेतलीयत आणि पुढचा तपास सुरू केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या मृतदेह जवळपास 10 तास पाण्यात असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.  पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरती लाल खूण आहे. चेह-याच्या उजव्या बाजूकडील गालावर ८ सेंटीमीटर बाय ३ सेंटीमीटर एवढी मोठी गडद लाल रंगाची खूण आहे. इतकंच नाही तर उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण आहे.
 
मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर आलेली. मात्र आता विस्तृत अहवालानुसार शरीरावर काही खुणा असल्याचं उघडकीस आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित