ठाण्यातून 2 कोटी रुपयांच्या कोडीन पावडरसह राजस्थानमधील एका 48 वर्षीय मेडिकल सेल्सला अटक केली आहे. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली. गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमधून आरोपीला अटक केली असून सध्या त्याची चौकशी पोलीस करत आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने 9 मे रोजी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एका हॉटेलवर छापा आणि आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पथकाने 1 किलोपेक्षा जास्त कोडीन पावडर स्वरूपात एक अफू जप्त केले.जे जोधपूरहून कुरिअर सेवेद्वारे आरोपीला मिळाले होते.
आरोपी मेडिकल सेल्स एजेंट आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. आरोपीला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकॅट्रॉपिक सबस्टेन्सस कायद्यांतर्गत अटक केली असून त्याच्याकडे हे बंदी घातलेले अमली पदार्थ कुठून आले पोलीस याचा तपास करत आहे.