पालघर मध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या भावावर आणि काकावर गंभीर आरोप केले आहे. मुलीने तिच्या काकांवर आणि भावावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. नंतर मुलगी गर्भवती झाल्याने तिला गर्भपात करण्यास बाध्य केले. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ आणि काकाला अटक केली आहे.
हे प्रकरण पालघरचे असून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने आणि भावाने वारंवार बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुळे ती गरोदर राहिली.काका आणि भावाला हे कळल्यावर त्यांनी तिला गर्भपात करण्यासाठी नेले आणि गर्भपात केला.
तिने पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मुलीने तक्रारीत म्हटले आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेम्बर दरम्यान तिच्या भावाने आणि तिच्या काकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
गर्भवती राहिल्यावर तिचे गर्भपात करण्यासाठी नेले. या प्रकरणी आरोपी भावावर आणि काकांच्या विरुद्ध गर्भपात, धमकी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर मीरा- भाईंदर वसई- विरार पोलिसांनी आरोपी भावाला आणि काकाला अटक केली आहे.