मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील पोद्दार शाळेची बस विद्यार्थ्यांसह बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यांनतर खळबळ उडाली होती. शाळा सुटल्यावर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. 5 वाजे पर्यंत मुलं घरी आले नाही, आणि बस चालकाला फोन केल्यांनतर त्याचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पालक काळजीत होते. या संदर्भात शाळेकडून काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे पालकांमध्ये चिन्तेचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी शाळेत आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि शाळेत विचारपूस केली. पोलिसांनी तपास घेण्यास सुरु केली आणि त्यांना बस आणि विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शाळेचा पहिला दिवस असून बस चालक देखील नवीन असल्यामुळे त्याला रस्त्याची माहिती नव्हती तो रास्ता भरकटला आणि बस दोन तास उशिरा पोहोचली. मुलं घरी आली नाही म्हणून पालकांनी शाळेत धाव घेतली. आता सर्व विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले आहे. शाळेने पुढील दोन दिवस शाळेची बस जो पर्यंत बस चालकाला रस्त्यांची माहिती होत नाही तो पर्यंत बसेस सुरु होणार नसल्याची माहिती दिली आहे.