Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला प्लास्टर, टेनिस खेळतांना झाली दुखापत

राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला प्लास्टर, टेनिस खेळतांना झाली दुखापत
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (07:24 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सोमवारी शिवाजी पार्क येथे टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून हेअरलाईन प्लास्टर केलं आहे. दुखापत होताच हिंदुजा हॉस्पीटलमध्ये जाऊन उपचार घेतले. डॉक्टरांनी सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र तरीही  त्यांनी पक्षाच्या बैठकीला पोहोचत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 
 
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याचे आदेश राज ठाकरेंनी  मनसैनिकांना दिलेत.या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला संबोधित करण्यासाठी राज ठाकरे वांद्र्यात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हाताला प्लास्टर पाहून एकच चर्चचा सुरु झाली. 
 
राज ठाकरे अनेकदा ते शिवाजी पार्कमध्ये खेळाचा आश्वाद घेत असतात. शिवाजी पार्क जिमखान्यात चिरंजीव अमित यांच्यासोबत टेनिस खेळतानाचे त्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. राज ठाकरे यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येच्या मोठी घट