Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai Aarey Metro Car Shade: आरेतील मेट्रो कारशेडला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध प्रदर्शन

mumbai metro 3
, रविवार, 21 ऑगस्ट 2022 (11:49 IST)
मुंबईत मेट्रो कारशेड ला विरोध सुरु आहे. आरे जंगलात सुरु असलेलं हे आंदोलन आक्रमक भूमिका घेत आहे. आज महाराष्ट्रात काँग्रेसचे आरे मेट्रो कारशेड च्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या घरासमोर प्रदर्शन होणार आहे.कॉंग्रेस कार्यकर्त्यांबरोबर पर्यावरण प्रेमीदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. 
 
महाविकास आघाडी सरकार असताना 808 एकर जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गाला स्थलांतरित करण्याचा निर्णय ठाकरे सरकार कडून घेण्यात आला होता. या निर्णयात बदल करून मुंबई मेट्रो कारशेड आरेतच बनविण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकार यांनी घेतला आहे. यावरून पर्यावरणवाद्यांनी आणि इतर पक्षांनी विरोध दर्शविला असून आज काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह पर्यावरण प्रेमी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर प्रदर्शन करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर पोलीस  बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Senior Citizen Day 2022: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2022