Publish Date: Sat, 13 Jun 2020 (22:09 IST)
Updated Date: Sat, 13 Jun 2020 (22:10 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून मुंबईत व्हायरसने थैमान मांडला आहे. आज राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहचली आहे. दिवसभरात 113 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत तसेच सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे. तसेच राज्यातल्या मृतांची संख्या 3830 वर गेली आहे.
आज 1550 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे तर 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणार्या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे.