ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
ऑक्सिजनअभावी १६८ पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता. इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.