rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर मार्चपर्यंत बंदी

mumbai police
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (12:23 IST)
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1 मार्चपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
 
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक हजार किलो फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिला