मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक मोडकसागर तलाव भरून वाहू लागला आहे. बुधवारी दुपारी १.०४ वाजताच्या सुमारास भरून वाहू लागला आहे. यापूर्वी मुंबईतील पिण्यायोग्य पाणी नसलेला पवई हा कृत्रिम तलाव ५ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास भरून वाहू लागला होता. मोडक सागर पाठोपाठ तुळशी तलावही भरण्याच्या मार्गावर आहे.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मिळून एकूण ८,१६,३७३ दशलक्ष लिटर (५६.४० टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा पुढील २१२ दिवस म्हणजे पुढील ९ फेब्रुवारी २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे. तसेच, अद्यापही पावसाळ्याचा अडीच महिना बाकी असून या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडल्यास सर्वच तलाव लवकरात लवकर भरून वाहू लागतील.
सात तलावातील पाणीसाठा व टक्केवारी -:
तलाव पाणीसाठा टक्केवारी दशलक्ष लि.
उच्च वैतरणा ९९,२६८ ४३.७२
मोडकसागर १,२८,९२५ १००.००
तानसा ९६,८९४ ६६.७९
मध्य वैतरणा १,०४,३२२ ५३.९०
भातसा ३,६६,११३ ५१.०६
विहार १४,७३० ५३.१८
तुळशी ६,१२१ ७६.०८
———————————————————-