तब्बल 12 दिवसांनी खासदार नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे. नवनीत यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना तेथून थेट लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या वर राजद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याच्या अट्टाहासामुळे त्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.
खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना बुधवारी, 4 मे रोजी सत्र न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला. नवनीत आणि रवी गेल्या 11 दिवसांपासून तुरुंगात होते. नमूद अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होईल, त्यानंतर नवनीतला पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे सत्र न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.