नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला तासाला 200 ऐवजी 800 भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. 1 जानेवारी रोजी नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांसाठी प्रति तास 200 ऐवजी 800 भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. QR कोड असलेल्या भाविकांनाच या दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी QR कोड घेतलेला नसेल त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 12.30 ते संध्याकाळी 7 तसेच रात्री 8 ते ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने राज्यातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी सिद्धीविनायक मंदिरही भाविकांसाठी सुरू झालं असून सध्या तासाला दररोज 200 भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. फक्त 1 जानेवारी रोजी ही संख्या 200 ऐवजी 800 करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आताच दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.