कल्याणमध्ये कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडाने त्यांच्या घरातील दोन डॉबरमॅन कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरी देखील पोलिसांनी कुख्यात गुंड फिरोज मेंटलला शिताफीने अटक केली आहे .
कल्याणच्या वालघूनी परिसरात कुख्यात गुंड फिरोज मेंटलची अनेक वर्षापासून दहशत आहे. फिरोज मेंटलवर गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. तो कोणावरही हल्ला करतो. त्याच्या या सटकू वृत्तीमुळेच त्याला फिरोज मेंटल हे नाव पडले आहे.
पोलीस अधिकारी दीपक सरोदे, गणेश कुंभार यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पोहचली. फिरोज मेंटलने पोलिसांच्या अंगावर दोन डॉबरमॅन कुत्रे सोडले. कुत्रे आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु होता. याचा फायदा घेत मेंटल हा पळून गेला. मात्र, कुत्र्यांना कसेबसे चकवीत अखेर पोलिसांनी फिरोज मेंटलला एका तासाभरात जेरबंद केले. फिरोज मेंटलपुढे त्याच्या मागे डॉबरमॅन कुत्रे आणि या कुत्र्यांच्या मागे पोलीस हा थरार एक तासभर चालला.