भिवंडी -ठाणे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावे या साठी मनसेने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते आणि टोल नाक्याची तोटफोड करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.या प्रकरणात आज सकाळी मनसेच्या ठाणे जिल्ह्याचे सचिव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी टोल नाके फोडून आपला आक्रोश व्यक्त केला.मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याचे काच फोडून घोषणा केल्या. या मुळे टोलनाक्याचे फार नुकसान झाले आहे. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले .सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भिवंडी-ठाणे मार्गावर रस्त्यात खूपच खड्डे झाले आहे.आणि या मार्गावरील कशेळी टोल नाकावरील केली जाणारी वसुली बंद करावी.असे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.या साठी त्यांनी आंदोलन केले होती