भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारामुळे देशाचे आणि राज्याचे लक्ष कल्याणकडे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांचे कल्याण दौरे वाढताना दिसत आहेत.
कारण माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे उद्या ८ फेब्रुवारीला कल्याण दौ-यावर जाण्याची चिन्हं आहेत. त्याचवेळी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उद्याच कल्याण शहरात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिस गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला रात्री पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी फायरिंग केलं होतं. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही कल्याणमधील कोळसेवाडी भागातील आहेत. त्याच भागातील वर्चस्व आणि राजकीय शत्रुत्वातून गोळीबार झाला होता. त्यानंतर आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही याच कोळसेवाडी परिसरात येणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या दौ-याला विशेष महत्त्व आहे.