Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

सचिन वाझेची पुन्हा एकदा ३ एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी

Sachin Waze will be remanded in NIA custody till April 3
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:45 IST)
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्यप्रकरणी संशयित आरोपी आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या एनआयए (NIA) कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेची पुन्हा एकदा ३ एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
 
एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यावेळी तपासात सहाकार्य केल्याचा दावा करत वाझेने पुन्हा एकदा एनआयए कोठडी नको, अशी विनंती केली आहे. तसेच यादरम्यान वकिलांचा युक्तीवादही झाला. शिवाय याप्रकरणाची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी एनआयएने १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण तरी देखील वाझेच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित रुग्ण दाखल