Eknath Shinde on BMC Election: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 60 हजार कोटींच्या वार्षिक बजेटसह बृहन मुंबई महापालिका जिंकण्याची तयारी सुरु केली आहे. काल एकनाथ शिंदे यांनी बीएमसी निवडणुकीच्या तयारी संदर्भात रामटेक येथील शासकीय निवासस्थानी बैठक घेतली.
या बैठकीला मुंबईचे विद्यमान खासदार, आमदार, माजी नगरसेवक माजी आमदार, माजी खासदार उपस्थित होते. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत शिंदे यांनी उपस्थित नेत्यांना बीएमसी निवडणुकीत कोणत्याही स्थितीत जिंकायचे आहे असे सांगितले.
शिवसेना नेत्यांना शिंदे काय म्हणाले?
मी स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन विकासकामांची पाहणी करणार आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा.
निवडणूक महायुतीच्या नावावर लढणार, सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा.
विजेत्या खासदार व आमदारांना विशेष जबाबदारीने काम करावे लागेल.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत, मुंबईत पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा.
केलेले काम आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवा.
BMC कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे, त्यामुळे शांत बसू नका आणि कामाला लागा.